'भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत अण्णांना निर्णायक विजय मिळाला आहे ' असे श्री सहस्त्रबुद्धे यांना वाटते आहे कि काय असे त्यांच्या प्रतिसादावरून वाटते. अण्णांनी युद्धातील पहिली लढाई जिंकली असली तरी निर्णायक लढाई निवडणूकीचे वेळी आहे. त्या लढाईत आपण निर्णायक विजय मिळवूच अशी सर्व पक्षातील भ्रष्ट नेत्यांना खात्रीच आहे. लोकसभेतील व विधानसभेतील सर्व 'दागी' नेते वा त्यांची बुजगावणी कायदेमंडळात पुन्हा दिसणार नाहीत हे स्वप्न प्रत्यक्षात आणले की युद्ध जिंकले असे म्हणता येईल. त्यानंतरच खरे जनलोकपाल बिल व इतर सर्व प्रकारच्या सुधारणा होणे शक्य होईल. इतक्यात वैश्विक मान्यता, कार्य इत्यादींचा विचार मुख्य कार्याला घातक ठरेल. एवढेच नाही तर असे फाटे फोडण्याचे उद्योग जाणीवपूर्वक चालूच आहेत असे प्रत्येक येणाऱ्या बातमीत जाणवते. अण्णांचे प्रतिस्पर्धी इंग्रजांपेक्षाही बलाढ्य आहेत कारण ते येथलेच आहेत. परके नाहीत (मानसिकता परकियांचे गुलाम होऊन राहाण्याचीच असली तरी!). त्यामुळेच 'अभी दिल्ली बहोत दूर है, लेकीन पहूंच के बाहर नही!'