'भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत अण्णांना निर्णायक विजय मिळाला आहे '
नाही. असे मला वाटत नाही. मात्र निर्णायक विजय मिळे न मिळे पर्यंत अण्णांना गाव पातळीवर देश पातळीवर लढवत गुंतवून ठेवायचे आणि संपूर्ण मानवजातीला ... जेथे अशा मार्गदर्शकांची गरज आहे ... त्यांच्यापासून वंचित ठेवायचे? ... असा माझा रोख होता. असो.
तरी निर्णायक लढाई निवडणूकीचे वेळी आहे
हे बाकी अगदी खरे. अण्णांना शहरी भागातून जास्त पाठिंबा मिळालेला आहे. मागच्या कित्येक निवडणुकांमध्ये मतदानाचे प्रमाण शहरी भागात कमी होते. कित्येकांची नावेच मतदार याद्यांत नव्हती. त्यामुळे अण्णांनि आता निवडणुका जवळ येताच कंबर कसावी आणि शहरोशहरी कार्यकर्त्यांची फौज निर्माण करून मतदार याद्यांत अधिकाधिक नावे आहेत की नाहीत त्याची टेहेळणी सुरू करावी आणि पाठपुरावा करावा. निवडणुकांचे दिवशी सर्व मतदारांना उद्युक्त करून मतदान करण्यास प्रवृत्त करावे. असे केले तर विजय दूर नाही. (... पुण्यातून जिथे एके काळी मोहन धारिया (कोंग्रेस्कडून) ८०००० मतांनी निवडले गेले होते. तिथे मागच्या निवडणुकीत कलमाडी फक्त वीस एक हजारांनी निवडून आले होते. .. हे लक्षात घ्यावे.)
एक कळकळीची विनंती... लेखनात लाल निळे रंग निष्कारण वापरू नये. ते बटबटीत आणि उथळ वाटतात. गांभीर्य वाटत नाही. कृपया मोह आवरावा. धन्यवाद.