१)अण्णांनी पाकिस्तानात जावं/जाऊ नये.२)त्यांनी गावातच राहावं/राहू नये.३)त्यांनी शहरात जावं.४)त्यांनी कार्यकर्त्यांची फौज उभारावी .(अण्णाफौज/अण्णासेना?)५)त्यांनी मतदार याद्या तपासाव्यात.६)त्यांनी मतदारनोंदणीची मोहीम उघडावी.७)त्यांनी मतदारांना मतदानकेंद्रावर जाऊन मत देण्यास प्रवृत्त करावे/भाग पाडावे. इ. इ. इ.

आणि हे सर्व त्यांनी भ्रष्टाचाराचा बुरखा फाडण्यासाठी करावं. (जसा काही भ्रष्टाचार हा बुरख्याआडूनच होतो किंवा भ्रष्टाचार करताना बुरखा पांघरावा लागतो.)