मतदारांना मतदानकेंद्रावर जाऊन मत देण्यास प्रवृत्त करावे/भाग पाडावे. इ. इ. इ.
पुष्पाताई, तुमच्या प्रतिसादातला उपरोध समजला (आणि आवडला पण
) पण मला वाटते हे हसण्यावारी नेण्यासारखे नाही. अण्णांच्या राळेगणसिद्धी मधल्या कार्याने प्रभावित होऊन आपल्या गावातही अशी सुधारणा व्हावी म्हणून अण्णांनी मार्गदर्शन करावे अशा तऱ्हेची मागणी होत होती. असे मला आठवते. आता पाकिस्तानातल्या लोकांनाही तसेच वाटले असणार. उद्या जगातून सगळीकडून अशी हाक येईल. एकटे अण्णा कुठे कुठे लक्ष घालणार, म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांची फौज निर्माण करावी असे म्हटले. फौज म्हणजे मारामारी करण्यासाठी नव्हे तर विधायक कार्य करण्यासाठी. आपणही गंभीरपणे घेतलेत तर तुम्हाला माझ्या म्हणण्याचा अर्थ कळेल, अशी माझी खात्री आहे.
कळावे.