यज्ञोपवित अथवा जानव्याच्या बाबतीत हा शब्दप्रयोग आहे.
सामान्यतः जानवे हे डाव्या खांद्यावर विसावते आणि कमरेच्या उजव्या बाजूला जाते.
अपसव्य हे याच्या बरोबर उलटे ... हे उजव्या खांद्यावर विसावते आणि कमरेच्या डाव्या बाजूला जाते.
अपसव्य करणे वाईट समजतात. श्राद्धाच्या वेळेस काही विधी अपसव्य करून करतात.
===
इलेक्ट्रॉनांच्या स्पिनच्या संदर्भात सव्य व अपसव्य इलेक्ट्रॉनांची जोडी असे काहीसे वाचल्याचे आठवते. यातील सव्य व अपसव्यचा अर्थ काय? कुठली स्पिन सव्य व कुठली अपसव्य?
क्लॉकवाईज आणि अँटिक्लॉकवाईज ... एक सव्य तर दुसरे अपसव्य.
===
सव्यापसव्य म्हणजे (नको असलेला) व्याप या अर्थाने वापरल्या जाणाऱ्या शब्दाशी त्याचा काय संबंध?
आता हा संबंध लक्षात आलाच असेल. एकच काम एकदा सुलट प्रकारे, एकदा उलट प्रकारे, एकदा असे एकदा तसे म्हणजे सव्यापसव्य!