भ्रमंतीसाहेब,
तुम्ही uncertainity principle चा उल्लेख केलात म्हणून आठवले, आईनस्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांतामुळे, काळा(टाईम)विषयी असणाऱ्या सामान्य मान्यतेच्या अस्तित्वावर बरेच प्रश्न उठतात. त्या सिद्धांतानुसार काळ म्हणजे एक एकसंध एन्टिटी आहे. आपण आता त्याच्या एका विशिष्ट बिंदूवर आहोत. यालाच सामान्यतः वर्तमानकाळ म्हणतात. आणि आपण या बिंदूच्या पुढे किंवा मागे (तत्वतः) जाऊ शकतो. त्याहिपुढे जाऊन असे म्हणता येते की, ज्याला आपण भविष्य म्हणतो ते म्हणजे दुसरे काही नसून आत्ताच्या बिंदुपुढचे बिंदू, आणि ते आधीचेच तेथे आहेत, त्यामुळे मनुष्याला स्वतंत्र इच्छा (फ़्री विल) नाही असा निष्कर्ष निघतो ! याचे एक गमतीदार उदाहरण दिले जाते, समजा तुम्ही एका तळ्याकाठी फ़िरायला गेला आहात, आणि तुम्ही पाण्यात एक खडा फेकला, तुम्हाला असे वाटेल की माझ्या मनात तशी इच्छा आली म्हणून मी खडा फेकला, पण आधीच्या युक्तिवादानुसार "कारण काळाच्या पुढच्या बिंदूवर *पाण्यावर तरंग उठले* असे आहे, केवळ त्यासाठी तुम्ही दगड फेकला, तुमच्या इच्छास्वतंत्र्याने नव्हे!" असा अर्थ निघतो (!)
भारतीय तत्वज्ञान सुद्धा याच विचाराचे दिसते, "विधिलिखित" ही संकल्पना एक्झॅक्टली अशीच आहे.
मी काही भौतिकशास्त्राचा तज्ञ नाही. मध्यंतरी डिस्कव्हरी वाहिनीवर आलेल्या एका कार्यक्रमात मी हे ऐकले. पण हे सर्व संशोधकांना मान्य नाही असेही त्या कार्यक्रमात नमूद केले होते.
पण ते जर सत्य असेल तर येथे चालू असलेल्या वादाला काहीही अर्थ उरत नाही, कारण इंग्रजांची *घुसखोरी*, स्वातंत्र्यलढा, स्वातंत्र्यप्राप्ती आणि भारताची प्रगती या सर्व घटना आधीच्याच ठरलेल्या होत्या!!! जर-तर चा प्रश्नच येत नाही :)
जरी पटले नाही तरी काही क्षणांसाठी असा विचार करून पाहा, प्रत्येक गोष्ट किती वेगळी दिसते ते :)
आपलाच,
~शशांक