>तीन तास बैंशी वर्षाचे वय विसरून सर्वांसोबत चाललो होतो. प्रथम याला मन:पूर्वक दाद देतो.
पण भारतातल्या भ्रष्टाचाराचं मूळ कारण लोकसंख्या आहे. कुणीही काय वाट्टेल ते कायदे करो किंवा भारतीयांचा विदेशातला पैसा इथे आणोत (अर्थात त्यानी निश्चीत रिलीफ मिळेल) पण भ्रष्टाचार संपेल ही आशा वृथा आहे.
जस्ट इमॅजीन, एका घराची क्षमता आई-वडील आणि दोन मुलं अशी चारजण राहण्याची आहे तिथे चवदा लोक रहायला लागले तर कितीही नियम केले आणि काहीही सुखसोयी केल्या तरी त्या घरात नेहमीच गोंधळ राहणार, संधी आणि सोयी यांचं सर्वांना सुखाचं होईल असं वाटप अशक्य आहे.
नाऊ जस्ट सी धिस अदर वे, आहे त्या देशात साठ कोटी लोक झाले, एव्हरेथींग विल बी फँटास्टिक, इतकी संपन्नता आणि संधी असतील की भ्रष्टाचार आणि जातीयवाद आपोआप संपतील.
तुम्ही फक्त एक करा, जे जे नववीवाहीत तुमच्या संपर्कात येतील त्यांना मनापासून सांगा, मुलगा असो की मुलगी, जस्ट लिमीट योर फॅमिली टू वन चाईल्ड. ते दोघही सुखी आणि संपन्न होतील, मुलाचं संगोपनही उत्तम होईल आणि येत्या पंचवीस ते तीस वर्षात वी विल हॅव सॉल्वड द इश्यू.
संजय