आपण दिलेले संदर्भ तपासले.. त्यात कळले कि चाल हुबेहुब तीच आहे, पण शब्द वेगळे आहेत.
मालती पांडे यांची दोन्ही गाणी अनिल भारती यांनी लिहिलेली आहेत, त्याला संगीत मधुकर पाठक यांचे आहे चारही गाण्याचे संगीतकार सुधिर फडके नव्हेत. ऊन पाऊस चित्रपट १९५४ साली आला होता, पण मधुकर पाठक यांची गाणी कधी आली होती त्याचा उल्लेख सापडत नाहिये.. कदाचित १९५४ पुर्वी आली असतील आणि मग मुखडा, चाल तसेच ठेवून बाकी शब्द बदलून ऊन पाऊस चित्रपटात २ गाणी घेतली असतील... कुणास ठावुक काय प्रकार आहे?!
आता गदिमा, सुधिर फडके यांच्याबाबत - हे सर्व अत्यंत प्रतिभावान, सिद्धहस्त वगैरे आहेत (होते नव्हे - आहेत - आपल्या आठवणितून कधिच जाणार नाहित) यात काही वाद नाहि, पण कुणाच्या तरी गाण्यावरून बेतलेली नवीन गाणी बेतणे हे अगदि पुर्वीपासून चालत आलेले आहे - त्यातून कुणिही सुटलेले नाही - शंकर जयकिशन, ओ. पी. नय्यर, सी. रामचंद्र, सचिनदेव बर्मन, राहुलदेव बर्मन, लक्ष्मिकान्त प्यारेलाल, वगैरे दिग्गज संगितकार सुद्धा यातून सुटलेले नाहित... पुरावे आहेत.. या सगळ्यांनी कधी ना कधी जुन्या इंग्रजी गाण्यांच्या चाली वापरून 'कौन है जो सपनोंमें आया' सारखी मधुर गाणी दिली आहेत..