अमित चितळे,
छान मुद्दा मांडलात!
निव्वळ भाषांतराच्या दृष्टीने आपण सुचविलेले वाक्य आम्हांस पटते. लिखाणाचा एका भाषेतून दुसर्या भाषेत होणारा प्रवास हा त्या भाषिकांचे विचार, स्वभावधर्म, संस्कृती या सर्वांच्या अनुषंगाने होत असेल तर तो अधिक रुचकर वाटतो.
'आज नशीब जोरावर आहे' - मधे सकारत्मक आशा ठेवून दैवावर विसंबण्याचा भाग दिसतो. (थोडासा जुगार खेळण्याचाही भाग दिसतो.) 'आलिया भोगासी असावे सादर' चा अर्थ 'आता दुसरा उपाय नाही, जे काही भोग आहेत ते भोगावयासच हवेत' इतका मर्यादित नसावा असे वाटते. तो असा काहीसा असू शकेल का? :
हवे तर ह्याला भाषांतर न म्हणता भाषाभ्यंतर म्हणू.
निव्वळ भाषांतरात 'आज नशीब चांगले आहे म्हणून मी टिचकी मारीन' असा विचार वाटतो. भाषाभ्यंतरात 'स्वकर्मावर भरवसा आहे आणि जे येईल ते हाताळायची तयारी आहे म्हणून मी टिचकी मारीन' असा विचार वाटतो.
याशिवाय पद्यामुळे येणारी रसाळता आणि त्याच्या ऐतिहासिक संदर्भामुळे भाषिकांना वाटणारा जिव्हाळा हे अतिरिक्त लाभ आहेत.
आपला
(कर्मवादी) प्रवासी