सुधीर,
बरेच मुद्दे पटले... विशेषतः लिबिया, सिरीयाबद्दलच्या धोरणाबाबतचे, आखाती राष्ट्रांबद्दलचेही.
एक-दोन उल्लेख मात्र जरा खटकले.
पॅलेस्टाईनला अमेरिकेनं मान्यता द्यायची वाट बघायची भारताला का गरज असावी.
चीन जरी सैन्याची जमवाजमव, त्याला आवश्यक ते रस्ते/विमानतळ बांधत असला तरी सध्याच्या परिस्थितीत (जी १९६२ पेक्षा पूर्ण वेगळी आहे) युद्ध होणारच अशी शक्यता वाटत नाही. हे फक्त डावपेच आहेत. 'व्यापारी चीन'ला ते परवडणारे असले(? ) तरी मानवणारे नाहीत. भारतानं गाफील राहू नये, पण त्याबरोबरच चीन युद्ध करेल म्हणून आपण इतरांचं लागूलचालन करावं असंही मला वाटत नाही.
- कुमार