फरक कायद्यात नसतो, फक्त एकच कायदा कडक आहे 'मृत्यूदंड' आणि तो काही सिवील ऑफेन्सना होत नाही.

त्यात कायदा कितीही कडक केला तरी अंमलबजावणी करणारा प्रामाणिक हवा, इथे सुप्रिमकोर्टाच्या न्यायाधिशांची चवकशी चालू असते तिथे बाकीच्यांची काय कथा? बरं असे किती प्रामाणिक लोक तुम्ही आणणार? कारण ज्या प्रमाणात भ्रष्टाचारी त्याप्रमाणात प्रामाणिक लोक उपलब्ध हवेत कारण शिक्षा होऊन परत त्याची अंमलबजावणी करणारे प्रामाणिक हवेत, इथे जेल मधून निवडणूकीचे फॉर्म भरणारे बहाद्दर आहेत, का तर म्हणे अजून वरच्या कोर्टात केस पेंडींग आहे.

तुम्ही कधी विचार केलायं? तेलगी वगैरे सारखे अनेक गुन्हे उघडकीला येतात, शिक्षापण होते आणि मजा म्हणजे त्यानी अफरातफर केलेला पैसा कुठे गेला हे ज्याम समजत नाही, लोक इतके बेसावध आहेत की अपहार केलेला पैसा कुठे गेला हा विचार देखील त्यांच्या मनात येत नाही. हर्षद मेहता घ्या, नगरवाला घ्या, केतन मेहता घ्या, पैसा कुठे गेला विचारू नका!

तुम्ही एक साधं लॉजिक बघा, देश असं काही नाही, तो अनेक कुटुंबांचा समूह आहे, जर प्रत्येक कुटुंब  संपन्न आणि प्रामाणिक झालं तर देश संपन्न झालाच म्हणून समजा. काय आहे या कौटुंबिक संपन्नतेचं रहस्य? वन फॅमिली वन चाईल्ड! 

मला वाटतं लोकांनी त्यांच्या भ्रमातून बाहेर यावं, नवे कायदे, मोर्चे, सत्याग्रह, उपोषणं, यातून भ्रष्टाचार कसा हटेल? भ्रष्टाचार व्यवहारात नाहीये, तो तिथे प्रकट होतोयं, तो आहे व्यक्तीच्या मनात आणि का झालंय मन असं तर दुर्भिक्ष्य! संधी आणि संपन्नता यांचं दुर्भिक्ष्य! आणि काय कारण आहे या विपन्नावस्थेचं? बेसुमार लोकसंख्या!

तुम्हाला देशाचं भलं व्हावंस वाटतंय तर फक्त एकच करा, प्रत्येक नवविवाहिताला एका मुलाचा संदेश द्द्या. मी स्वतः हे अनुभवतोयं, मलाही दुसऱ्या मुलासाठी अनेक कारणं सांगीतली गेली, पार जातीयवाद (म्हणजे त्यांची प्रजा फोफावेल) पासून ते संपन्न माणूस जर असा विचार करायला लागला तर खालच्या वर्गाचे (गरीब) लोक वाढतील आणि सामाजिक कलह वाढेल, मी स्वार्थी आहे, मुल एकटं पडेल, पुढचा काळ असा आहे की रक्ताची नातीच टिकणारेत वगैरे पण हा सगळा निव्वळ मूर्खपणा आहे. मी ज्या पद्धतीनं जगलो, मुलाचं संगोपन केलं, आता सर्वजण जी संपन्नता आणि मोकळीक अनुभवतयात आणि ज्या तऱ्हेनी सर्व आयुष्य आवाक्यात आहे त्यावरून मी निश्चीतपणे सांगू शकतो की मी स्वतः कोणत्याही आमिषाला भुलू शकत नाही आणि हीच चित्तदशा प्रत्येक संपन्न कुटुंबप्रमुखाची होईल, तुम्ही लोकसंख्या आवाक्यात आणा, सर्व प्रश्न सुटतील!

संजय