शशिकांतराव, उच्चविचारीराव, रंगाराव आणि जावडेकर-जी,
प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
भाषणे सनदी नोकरवर्ग लिहीत जरी असला तरी ती नेत्याने किंवा पक्षनेत्याने सांगितलेल्या धोरणानुसार असली पाहिजेत (व असतीलच. ) अनेक मसूदे बनतात, काटछाट होते, पुनर्लेखन होते तेंव्हां कुठे ते भाषण "तयार" होते. मग त्या भाषणाच्या मुद्द्यांची जबाबदारी ते भाषण देणाऱ्यावरच असते. साहेबाने सही केलेल्या पत्रातील चुकलेल्या मजकुराबद्दल बिचाऱ्या लघुलिपिकेला जबाबदार धरणे चुकीचे नाहीं कां?
लांगूलचालनाबद्दल मी कुठेही उल्लेख केलेला नाहीं. फक्त आपल्याला उद्या गरज लागण्याच्या शक्यतेकडे डोळे ठेवून अशा महत्त्वाच्या देशांना दुखविणे टाळले पाहिजे इतकेच माझे सांगणे आहे.
चीनबरोबर युद्ध कसे टळेल? आपण सगळीकडे पडते घ्यायचे ठरविले तरच. पण कुठेही आपण ताठ उभे राहिलो-उदा. व्हिएतनामच्या सागरी हद्दीत  तेलविहिरी खोदण्याचा प्रकल्प-तर कांहीं तरी वाईट होईलच. चीनला यात हस्तक्षेप करण्याचा अधिकारही नाहीं व गरजही नाहीं. पण आपण कच खाऊ या आशेने तो सगळीकडे अरेरावी करत आहे. (कदाचित हा मनोवैज्नानिक दबावाचा प्रयत्न असेल.) त्यामुळे मला तरी असे युद्ध आपल्याला कितीही नको असले तरी अटळ आहे असे वाटते. (माझी बत्तिशी न वठो हीच परमेश्वराकडे प्रार्थना! )
धन्यवाद.