आपल्या मताचा आदर राखूनही असे सांगावेसे वाटते की हा रामबाण उपाय नव्हे. किंबहुना हा उपायच नव्हे. आज धनिकवणिकांची(माफ करा, हा शब्द वापरावा लागतोय) एकुलती एक बाळे काय प्रताप दाखवत असतात ते जगजाहीर आहे. खासगी क्षेत्रातले अब्जावधी रुपयांचे घोटाळे ज्यांच्याकडून होतात त्यांच्या घरी सुबत्ताही असते आणि 'हम दो, हमारा एक या दो' असे चित्रही असते. मुलांचे संगोपन, संस्कार हा भाग महत्त्वाचा आहेच. पण थोडा कायद्याचा धाक आणि बरीचशी स्वयंशिस्त ही हवीच.कारण भ्रष्टाचार कोणी तिसरी व्यक्ती करीत असते असे नाही, तर बहुतेक वेळा ती तिसरी व्यक्ती आपणच असतो.