भ्रष्टाचार (व्यक्तिगत पातळीवर असो वा सामाजिक, आपला स्वतःचा असो वा व्यवस्थेमधला) आटोक्यात आणणे ही एक प्रकारची लढाई आहे आणि ती इंचाइंचानेच लढावी लागते. लोकसंख्या आणि भ्रष्टाचार यांचे सम प्रमाण असते, भ्रष्टाचार आणि तुटवडा यांचे सम प्रमाण असते ही समीकरणे सदोष आहेत. या समस्येसाठी सोप्पे आणि जलद अमलात आणता येतील असे उपाय नाहीत. किमान भ्रष्ट व्यवस्थेविरूद्ध योग्य मार्गाने लढणार्या व्यक्तीचा/ संघटनेचा तेजोभंग करायचा नाही असे ठरवून ते अमलात आणले तरी आपल्या वैचारिक भ्रष्टतेतला एक छोटासा हिस्सा छाटून टाकता आला असे समाधान प्रत्येकाला मिळू शकेल आणि तसे करता आले तर ते स्तुत्य ठरेल असे मला वाटते. (पूर्णपणे व्यक्तिगत मत, आग्रह नाही.) 

जिथे लोकसंख्यावाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत अशा संपन्न देशातल्या सुस्थापित, संपन्न व्यक्तीदेखील मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करतात. फार तर एकंदर संपन्नतेमुळे भ्रष्टाचारामुळे सामान्य जनतेची मूलभूत गरजांच्या बाबतीत होणारी अडवणूक मोठ्या प्रमाणात टळते असे म्हणता येईल. असो.

एक दुवाः भ्रष्टाचार