सायकॉलॉजिकल. प्रथम फिजिकल डायमेन्शनवर प्रयत्न व्हायला हवेत. जर उपलब्धी असेल तर भ्रष्टाचार अपवादात्मक होईल. जर सीटस मुबलक आहेत तर कॅपिटेशन फीचा विषयच संपतो.
लताजी, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे धनाढ्य लोक आणि त्यांची मुलं भ्रष्टाचार करतात हे खरंय पण त्यांना संधी का मिळते? कारण आपल्याला ती सवलत, ती संधी किंवा ती सोय हवी असते जी त्यांच्या हातात आहे , समजा तुमचं मंत्रालयात कामच नाही तर मंत्री कशात भ्रष्टाचार करणार?
प्रश्न भ्रष्टाचार कोण करतो हा नाहीये किंवा का करतो हा देखील नाहीये, भ्रष्टाचाराची संधी कशामुळे निर्माण होते हा आहे. तुम्ही नीट पाहा मग तुमच्या लक्षात येईल.
जर जागेचा तुटवडाच भासला नाही तर आदर्श घोटाळा कसा होईल?
जर लोक संपन्न झाले तर दहशतवाद कसा उरेल? पैश्यासाठी स्वतःचा जीव गमावायला कोण तयार होईल?
जस्ट सी, दुर्भिक्ष्य हा सेंट्रल इश्यू आहे आणि मानसिकता ही त्यातून तयार होणारी गोष्ट आहे.
शशिकांतजी, इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स हा मानवी जीवनातला फार खोल गेलेला विषय आहे, प्रतिष्ठा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे भ्रष्टाचाराला नाहीये, त्या माणसानी जमवलेल्या अफाट आर्थिक सत्तेला आहे आणि ज्याला ज्याला आर्थिक काँप्लेक्स आहे त्याला त्याला तो नमवू शकतो इतकीच त्याची कुव्वत आहे, तुम्हाला जर त्याच्या कडून कसलिही अपेक्षा नसेल तर तुम्ही अशी व्यक्ती समोर आल्यावर तिच्याकडे पाहणार देखील नाही, प्रतिष्ठा वगैरे फार पुढची गोष्ट आहे.
संजय