भ्रष्टाचाराचे मूळ हे बेसुमार वाढलेल्या लोकसंख्येमध्ये आहे, ह्या माझ्या अगदी प्रामाणिक मताशी आणखी कोणीतरी तितक्याच आग्रही पद्धतीने सहमत आहे, हे वाचल्यामुळे प्रतिसाद दिल्याशिवाय राहवले नाही!

स्वयंशिस्तीचा अभाव, वाढणारी लोकसंख्या, त्यामुळे निर्माण झालेली रिसोर्सेसची कमतरता, माणसामाणसांमधल्या सौजन्याचा अभाव, आपल्याला आधी मिळावं म्हणून पुढे घुसण्याची वृत्ती, हिरावून घेण्याची वृत्ती,  कोणतीही गोष्ट मिळवण्याची घाई ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असतात,  असं मला वाटतं.   उदहरणं आहेत मनात पण त्याबद्दल नंतर कधीतरी........

८२ व्या वर्षी लेखकाने जे केले, त्याबद्दल आदर आहे. आपल्यासारखी निष्ठेने आयुष्यभर काम करणारी, प्रलोभनांपासून दूर राहणारी माणसं आहेत, ही आशादायक आणि प्रेरणादायक गोष्ट आहे. आपल्याला शुभेच्छा.