मी बघीतलंय भारतीयांची विचार करण्याची पद्धत फार काँप्लिकेटेड आहे आपण वस्तुनिष्ठ विचार करण्याची सवय गमावलीये. कोणत्याही गोष्टीत सायकॉलॉजी, मग भावना, नंतर धार्मिकता आणि सरते शेवटी राजकारण आणलं की साधे सोपे प्रश्न सुद्धा इतके अवघड होऊन बसतात की बोलता सोय नाही.
जस्ट स्टार्ट थिकींग इन सिंप्लिसिटी, नक्की काय प्रश्न आहे, त्याचं मुळ कशात आहे असा विचार केला की लगेच उत्तर मिळतं, याला व्हर्टिकल थिंकींग म्हणतात आपण हॉरिझाँटल थिंकींग करतो मग पसारा वाढत जातो आणि प्रश्न जाम सुटत नाही.
सी धीस, आरक्षणाचा इश्यू, सर्व आरक्षण आर्थिक निकषांवर आधारित करा, झाला क्रायटेरिआ वस्तुनिष्ठ! संपला जातीयवाद, साधला मुळ हेतू : समान संधी, सर्वंकष विकास आणि दारिद्र्य निर्मूलन पण किती भानगडी होऊन बसल्या आहेत त्यात आणि ज्यानी विकास साधायचा तो उपायच मार्गातला अडथळा झालाय! म्हणजे ज्या किल्लीनी कुलुप उघडायचं ती किल्लीच कुलुपात अडकून बसलीये, त्या किल्लीनी कुलुप उघडण्याची शक्यताच संपवलीये! हाय की नाही गंमत! आता बोंबलायला काही होणार नाही, पिढ्यान्पिढ्या आंदोलनं, हिंसाचार, एकदा सवर्ण वर एकदा बहुजन वर आणि देश कायमचा खड्ड्यात!
संजय