ज्यांच्याकडे मुबलक आहे त्यांनाच भ्रष्टाचाराची अधिक संधी आहे पण हे संधी नाही म्हणून आपण नितीमान आहोत म्हणण्या सारखं आहे. आपण स्वाभिमान गमावलाय, म्हणजे स्वतःपेक्षा संपत्तीला श्रेष्ठ केलंय, अशा परिस्थितीत एकदम मानसिकता कशी बदलेल?

प्रथम वैध मार्गानी जगण्याची सोय तर हवी ना? जर लोकांच्या गरजा वैध मार्गानी पूर्ण व्हायला लागल्या तर स्वाभिमान गमावून गैरमार्ग अवलंबावा असं वाटणाऱ्यांची संख्या कमी होईल की नाही?

आपल्या विचारसरणीत आणखी एक दोष असायं की आपण एकदम एक्सेप्शनलाच हात घालतो. मी जेव्हा आदर्शचं उदाहरण दिलं तेव्हा मला असा मुद्दा मांडायचा होता की उपलब्धी (इथे ठराविक ठिकाणी जागा)  आणि पुरवठा यातली तफावत हे भ्रष्टाचाराचं प्रमुख कारण आहे, तिथून भ्रष्टाचाराला सुरूवात आहे. 'भ्रष्टाचाराची क्षमता' ही पुन्हा भ्रष्टाचार पुरता बोकाळल्यानी झालेली परिस्थिती आहे आणि ती क्षमता आणि मानसिकता भ्रष्टाचाऱ्यांचीच असणार हे उघड आहे. तुम्हाला असं वाटतंय की भ्रष्टाचारी मुबलकता आल्यावर भ्रष्टाचार करणार नाहीत!  असं कसं होऊ शकेल? पुरवठा मुबलक होण्यानी भ्रष्टाचाराची शक्यता संपेल असा माझा साधा मुद्दा आहे. बहुतेक जण जर रोजच्या दृष्टीनी सोयीच्या आणि प्रशस्त घरात सुखरूप रहायला लागले तर कुलाब्याला घर घेण्याचा विचार अपवादात्मक होईल इतकंच मला म्हणायचंय!

तुमच्या सोसायटीचा प्रश्न घ्या, पाण्याचं शॉर्टेज आहे पण विथ रिस्पेक्ट टू व्हॉट? नंबर ऑफ पीपल इन दी सोसायटी की नाही? आता अशा परिस्थितीत समजूतीनं वागणं हा संस्कार झाला पण देन वी आर अगेन रिलाईंग ऑन पीपल्स कॉन्शन्स आणि ती फार नाजूक गोष्ट आहे व्हाय नॉट कंट्रोल द पॉप्युलेशन? (आता तुमच्या सोसायटीत देखील वन फॅमिली वन चाईल्ड अशी परिस्थिती झाली तर प्रश्न लगेच सुटेल)!

संजय