मुरण्याच्या प्रोसेसला पर्याय नाही, तसेच ती  फास्ट करण्यासाठी खरे तर काही करता येत असेल असे वाटत नाही. शिजणे (वाफेवर) , परतणे, भाजणे, तळणे, वगैरे उष्णतेवर अवलंबून असलेल्या प्रक्रिया आहेत आणि मुरण्याची प्रक्रिया उष्णतेच्या सहाय्याने वेगाने वगैरे घडू शकत नाही. चवीमध्ये बराच फरक पडेल यात शंका नाही. दोन्ही चवी आवडण्यालायक असतील ह भाग वेगळा - पण मुरण्याची प्रक्रिया फास्ट होण्यासाठी २१ शिट्या वगैरे बरोबर नाही.

तसेच, जास्त शिट्या करण्यापेक्षा एक शिटी होते आहे असे वाटताच म्हणजे योग्य तेव्हढे pressure  आल्यावर थोडा वेळ आच कमी करणे आणि नंतर आपोआप  pressure  कमी होणे हे केव्हाही उत्तम. जास्त शिट्या होणे म्हणजे जास्त वेळा pressure release  होणे - त्याची प्रत्यक्ष शिजण्याच्या प्रक्रियेला खरी तर काहिही मदत होत नसते.

हा प्रयोग भात, कडधान्य, डाळ वगैरे वर करून बघा... अमुक अमुक शिट्या वगैरे जुन्या कल्पना मोडीत निघतील....