सहमत.

शिस्त व्यक्तिगत पातळीवर तर पाळावीच, ती सामाजिक जीवनातही असावी यासाठी तसे बाळकडू  लहानपणापसूनच द्यावे लागते हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आज जो व्यक्तिस्वातंत्र्याचा पाचकळ नखरा वाढला आहे आणि 'कंडिशनिंग' च्या नावाने सरसकट खडे फोडण्याची काल्पनिक जगात रमणार्या विचारवंतांची जी जोरदार हाकाटी सुरू आहे ती आपल्या देशातल्या आजच्या परिस्थितीत  तरी निश्चीतच पूर्णपणे चुकीची आहे असे वाटते.

व्यक्तीचे सारे मूल्यांकन 'पैसा' या एकाच निकषावर ठरवण्याची समाजाची मानसिकताही भ्रष्टाचाराला पोषक आहे. समाजाच्या भल्यासाठी असणारे नियम पाळून जगणार्या सरळ, साध्या, नीतीमान, सात्त्विक व्यक्तीला देखील प्रतिष्ठा मिळायला हवी असेल तर शिस्त पाळणे, एखाद्या सत्पुरूषाचा आदर्श समोर ठेऊन आपले वर्तन सुधारणे, नीतीमत्ता, चारित्र्य, सामाजिक मूल्ये या गोष्टीना जीवनात यथायोग्य महत्त्व देणे याला  बाळबोधपणा, गतानुगतिकता, मठ्ठपणा, बद्धता अशी लेबल्स लावून हास्यास्पद ठरवणे हे अर्वाच्य प्रकार थांबायला हवेत. या सगळ्या गोष्टीं समाजाच्या निकोप धारणेसाठी अनिवार्य आणि मोलाच्या आहेत हे आधी मनोमन मान्य व्हायला हवे. मग ते वास्तवात उतरण्याची शक्यता तरी असेल. असो.