श्री. विनायक,

दुसरा प्रकार लोकमान्य टिळक, सावरकर वगैरेंचा. ज्यांना स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार आहे असे वाटते. ही जागरूकता इंग्रजी शिक्षणामुळेच झाली.

हे पचायला जरा जडंच आहे.
शिवाजी महाराजांनी स्वराज्य म्हणजेच मराठ्यांचे 'स्वतंत्र' राज्य स्थापन केले. ज्या मराठ्यांच्या 'मूलभूत अधिकारा'साठी महाराजांनी कुतुबशाही, आदीलशाही आणि निजामशाहीशी वैर पत्करले, मराठ्यांना स्वातंत्र्य मिळवून दिले ते कुठल्या 'इंग्रजी शिक्षणाच्या' जोरावर? 
पाकिस्तानचे संस्थापक जिना हे तर नुसत्या शिक्षणानेच नाही तर मनानेही 'इंग्रज' होते. स्वतंत्र पाकिस्तानचे स्वप्न त्यांच्या डोक्यातही नव्हते. गांधीजींच्या राजकारणाला कंटाळून ते इंग्लंडला परतले. परंतु, मुस्लीमांना भडकवून स्वतंत्र देश बनवायचा मंत्र त्यांना दुसऱ्या एका मुसलमानाने दिला. स्वातंत्र्या नंतर त्यांच्या पाकिस्तानात औद्योगिक, सामजिक, राजकिय प्रगतीचे असे काय दिवे लागले?

इंग्रजांच्या पश्चात भारत आणि पाकिस्तानला प्रगतीपथावर वाटचाल करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असूनही पाकिस्तान मागे पडला आणि भारत पुढे गेला हे स्वच्छ दिसत असूनही इंग्रज नसते तर भारताची स्थिती अफगाणीस्तानपेक्षा वेगळी नसती असे म्हणणे कितपत सयुक्तीक आहे?