करार तोंडी असल्याने लेखी पुरावा कांहीच नाही. त्यामुळे शिष्याने असे कांही ठरले नसल्याचे सांगितले की प्राध्यापक कोर्टात हरणार. पण शिष्य त्याची नैतिक जबाबदारी पाळणार असेल तरच तो गुरूला पैसे देईल. खटला भरे पर्यंत शिष्याने एकही खटला जिंकला नसेल तर गुरूने त्याला जिंकायची संधी दिली असेही म्हणता येईल.  आणि तो जिंकल्यानंतर जर आता तुम्हाला मी पैसे देणे लागतच नाही असे शिष्य म्हणत असेल तर कायद्याने त्याचे बरोबरच आहे. पण तोंडी ठरलेला करार गुरुशी खाजगीत बोलतांना शिष्य मान्य करतो आहे. यावरून कायद्याने शिष्य बरोबर असला तरी नैतिक दृष्ट्या तो अपराधी आहे आणि गुरूची बाजूच बरोबर आहे.