निशिकांतराव,
तुमच्या इतर गझला-कवितांच्या तुलनेत ही रचना डावी वाटली. भावना तीव्र असल्यामुळे कदाचित काव्य कमी पडत असेल.
मतल्यात "क्ष्य" यमक घेतल्यावर पुढील सर्व द्विपद्यांमध्ये "क्ष" वापरले आहे. बरं, स्वर काफिया म्हणावे तर पुढील साऱ्या द्विपद्यांमध्ये "क्ष"च का? इतर अनेक अकारान्त यमके वापरता आली असती. आणि स्वर काफिया नसेल तर मतल्यात "क्ष्य" व नंतर "क्ष" चालतो का? जाणकारांनी कृपया खुलासा करावा. (स्वर काफिये वापरावे की वापरू नये, वापरल्यास ते फक्त आकारान्त व ईकारान्तच असू शकतात की अकारान्तही चालतात हे वाद वेगळे, त्यात सध्या पडत नाही).
"देशातले शिकारी खुर्चीस लक्ष्य केले"देशातल्या शिकाऱ्यांनी असा अर्थ अभिप्रेत आहे का? तसे असल्यास ओळीची रचना बदलावी असे सुचवावेसे वाटते.
झुंडीत लुटारुंच्या सारे मिळून खाती"झुंडीत लुटारुंच्या" वृत्तात बसत नाही.
मारून देश त्याचे श्राध्दात पक्ष केलेअर्थ नीट समजला नाही. "पक्ष"चा कोणता अर्थ घ्यायचा इथे? पंधरवडा हा अर्थ इथे लागू होत नाही. वर्ग, जात, जमात, बाजू ह्यातील कोणताही अर्थ असल्यास आधीच्या "श्राद्धात" चे प्रयोजन काय? आणि "पक्ष" हा श्राद्धचा समानार्थी शब्द म्हणून वापरला असल्यास "श्राद्धात श्राद्ध केले" का?