मलाही प्राध्यापक बरोबर आहे असे वाटते.
कारण केस जर विद्यार्थी जिंकला तर कायद्या प्रमाणे कोर्ट निकाल देईल की फी देऊ नये म्हणून ... पण त्यांचा  करार  हा खाजगी आहे. कोर्टाचा निकाल त्यावर काही परिणाम करू शकत नाही . करारा च्या अटीनूसार विद्यार्थी केस जिंकला आहे. त्यामुळे त्याला प्राध्यापकाला फी द्यायलाच लागेल पण उलट तो हरला तर करारानूसार प्राध्यापक त्याला फी मागू शकत नाही , पण कोर्टाचा आदेश विद्यार्थ्याला मानावाच लागेल नाही तर कायदेभंगाचा गुन्हा होईल म्हणून त्याला फी द्यायला लागेल .

एक शंका : शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्याने किती केस साठी काम केले? आणि त्या पैकी जर एक ही केस तो जिंकला नाही तर हा त्याचा वैयक्तीक दोष म्हणायचा कि त्याला शिकवणाऱ्याचे अपयश ?