'लॉ ऑफ लिमिटेशन'खाली 'टाईम बार् ड' झाले नाही असे गृहीत धरू.
तसे झाल्यास म्हणजे अमुक एक रक्क्म फी म्हणून कबूल केली होती असे शिष्याने 'प्राध्यापकाची मागणी' मान्य केल्यास प्राध्यापकाने खटला फीसाठी लावायचाच नाही. कुठल्यातरी वेगळ्या गुन्ह्यासाठी (उदा तू काल माझ्या घरी येऊन शिवीगाळ केलीस) लावायचा आणि तो मुद्दामहून हरायचा. मग शिष्य तो खटला जिंकेल. मग पहिला खटला जिंकल्यामुळे तो फी देण्यासाठी बांधील राहील. तरी शिष्याने फी न दिल्यास १. ब्रीच ऑफ प्रॉमिस आणि २. फी मागणी + मनस्तापाबद्दल आणि वेळेच्या अपव्ययाबद्दल भरपाई + कोर्टाचा खर्च याबद्दल दोन खटले प्राध्यापक महाशय शिष्याविरुद्ध लावून जिंकू शकतील.
सुधीर कांदळकर