धन्यवाद मिलिंदजी, अनिलजी आणि शशिकांतराव आपल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल.
मिलिंदजी-- इतकी परखड टिप्पणी आपल्याकडून अपेक्षित होती. मी गजला लिहायला सुरू केल्या नंतर मी रचलेली ही तिसरीच गजल आहे. दोषाची जाण होती पण ही रचना माझ्या एका काव्यसंग्रहात प्रकाशीत झाल्यामुळे. दुरुस्ती करणे प्रशस्त वाटले नाही. पण विषय माझ्या मनाला अगदी जवळ असल्यामुळे संकेतस्थळावर प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. बारीक विश्लेषणा बद्दल आपणास नमस्कार. अशाच प्रतिक्रियेची या पुढे पण अपेक्षा राहील.
शशिकांतराव-- आपण सात्त्विक संतापाने जी प्रतिक्रिया दिली  त्यात माझ्या गजलेचे यश दडलेले आहे. ही गजल राजकारण्याच्या वाचनात यावी ही माझी मनोमन इच्छा आहे. सध्याचे वातावरण बघता ती फलद्रूप होईल असे वाटत नाही. तरीही नैराश्यास थारा नसावा.