सीमोल्लंघनाला शुभेच्छा.

सुरुवातीच्या परिच्छेदांत लढाई हा शब्द अनेक वेळा आला आहे तो थोडासा खटकला. मला स्वतःला 'जीवनसंघर्ष' या शब्दापेक्षा 'जीवनकलह' हा शब्द अधिक आवडतो. असो. आयुष्यात अनेक वेळा तडजोडीच जास्त असतात. तोच तो पणा आला, गती कुंठित झाल्यासारखी वाटली की सभोवताल बदलावेसे वाटू लागते. पण चौकटी बदलल्या किंवा विस्तृत केल्या म्हणजे अवकाश बदलतेच असे नव्हे. क्षितिजापर्यंत पोचेतो क्षितिज दूरच आहे किंवा दूरदूरच पळते आहे असे वाटू लागावे, तसेच हे. समाधानक्षेत्रातून बाहेर पडायचे ते दुसरे समाधानक्षेत्र मिळविण्यासाठीच ना?

पण तरीही मानवाला बदल हवासाही असतोच. व्यवस्थापनशास्त्रातला नियम आहे(असे म्हणतात) की जितकी अधिक आणीबाणीची परिस्थिती तितके आपले शरीर आणि मेंदू अधिकाधिक कार्यक्षमतेने काम करू लागतात. सुखासमाधानाच्या आयुष्यात मनुष्य सुस्तावतो. आपल्यातल्या ऊर्जेचा योग्य तो विनियोग करता आला तर (लढाई)जिंकलीच.

आपल्याला नक्की काय हवे आहे याचे योग्य उत्तर मिळाले तर सीमोल्लंघन सुखाचे ठरू शकते.

लेख आवडला.