म्हणजे वाचकांना विरोधाभासाची मजा कळली असती. 

 तुमच्या केसमध्ये शिष्य लढवत असलेली ही पहिलीच केस आहे हे तुम्ही क्लिअर केलेलं नाही, ते क्लिअर झाल्यावर आता अशी परिस्थिती होईल:

१) वकील फी क्लायंटकडून घेतो. इथे शिष्य स्वतःला डिफेंड करतोयं म्हणजे तो जिंकला तरी त्याला फी मिळणार नाही (तो स्वतःच्या केससाठी स्वतःकडून फी कशी घेणार?) त्यामुळे त्यानी त्याच्या गुरूला फी देण्याचा प्रश्नच येत नाही. ज्या केसची फीच मिळाली नाही ती जिंकली तरी गुरूला फी कशी देणार? जिंकण्या व्यतिरिक्त शिष्याला काहीच मिळालेलं नाही.

२) गुरूनी दावा शिष्यानी चुकवलेल्या फीचा लावलायं, कोर्टात जर गुरू प्रामाणिक राहिला (आणि तुमची ही काल्पनिक केस असल्यानी त्याला प्रामाणिक राहावेच लागेल नाहीतर 'पहिली केस जिंकल्यावर तुमची फी देईन' या बेस आर्ग्युमेंटलाच शह बसेल आणि तुमची सगळी कथा फेल होईल). तर कोर्ट फक्त 'शिष्यानि फी द्यायला हवी' इतकीच ऑर्डर पास करू शकेल (कारण फीची रक्कम जिंकलेल्या पहिल्या केसच्या फी इतकी आहे आणि त्यामुळे अनिश्चीत आहे) आणि त्या परिस्थितीत शिष्य हारल्यानी शिष्याचं आर्ग्युमेंट 'पहिली केस जिंकल्यावर तुमची फी देईन' स्टँड होईल आणि गुरूला फी मागता येणार नाही. म्हणजे गुरू जिंकला तरी त्याला फी मागता येणार नाही कारण शिष्य 'जिंकलेल्या केसची फी, शिकवण्याची फी म्हणून देणार होता' आणि या स्थितीत शिष्य हरलायं!

मला वाटतं आता लोकांना विरोधाभास कळेल.

संजय