तुमच्या मनाची जोपर्यंत बडबड संपत नाही तोपर्यंत दृश्याचा बिंदू गवसत नाही आणि जर हे दोन्ही बिंदू गवसले तर संपूर्ण शरीराची जाणीव हा तिसरा बिंदू गवसतो.

हे चक्र उलट क्रमानी परत असंच आहे, साधारणतः पहिल्यांदा मन बोलायला लागतं मग दृश्याची मालिका सुरू होते (काही वेळा एखाद्या शारीरिक जाणीवेमुळेही दृश्यमालिका सुरू होते) आणि एकदा हा दृकश्राव्य चालू झाला की आपण देहात आहोत असं वाटायला लागतं आणि मग लगोलग प्रसंगात सापडल्यासारखं वाटतं!

एकदा तुम्हाला निराकाराप्रत येण्याचा मार्ग गवसला की ज्या रस्त्यानी आपण बाहेर गेलो त्याच रस्त्यानी आत यायचंय!

तुम्हाला फक्त सगळी प्रक्रिया फक्त कळण्याचा आवकाश आहे! तो ट्रॅक क्लिअरली दिसायला हवा इतकंच!

ते गाण्याची सम कळण्यासारखं आहे, एकदा समेवर कसं यायचं ते कळलं की झालं मग गाणं कोणतंही असो! 

संजय