संजयजी,
आम्हा सर्वांच्या जीवनाचा उत्सव बनवण्यासाठी, अत्यंत सोप्या शब्दात ही पन्नास लेखांची अप्रतिम मेजवानी दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि अभिनंदनही ! तुमचा प्रत्येक लेख अत्यंत प्रामाणिक,मोजक्या शब्दात विषय मांडणारा, अत्यंत कळकळीने लिहिलेला असतो आणि त्यामुळेच थेट हृदयाला भिडतो.ज्यांनी या ना त्या मार्गाने सत्य शोधण्याचा प्रयत्न केलाय त्यांनाच खरे तर या लेखांचे मूल्य कळेल.
बाकी काय लिहू ? याप्रसंगी 'देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी' इतकेच म्हणेन .