प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद! खेदाची गोष्ट आहे की आपली लोकशाही अशा रक्तरंजित इतिहासाच्या व वर्तमानाच्या माणसांच्या आधिपत्याखाली आहे. त्यांना आपल्यापैकीच कोणीतरी निवडून देत असते. पैसा, सत्ता, प्रलोभनांच्या जोरावर ते व त्यांच्या पुढच्या पिढ्या लुबाडत राहतात आणि आपण लुबाडले जात राहतो. त्यांची सत्ता उलथवून देऊन जेव्हा जनता खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी निवडेल तो सुदिन!