'पण मंझिलपेक्षा प्रवास महत्त्वाचा असू शकतो'
अगदी अगदी. यश मिळवण्यासाठी केलेली धडपड नंतरच्या आयुष्यात लक्षात राहाते, प्रत्यक्ष यश नाही. यशापर्यंतचा प्रवास इंटरेस्टिंग(मराठी शब्द?) असतो.
आपण परिस्थितीच्या फटीतून मार्ग काढत असतो, कधी लूपहोल्स शोधून तर कधी शेरास सव्वाशेर होऊन. परिस्थितीशी दोन हात करणे या अर्थी तुम्ही लढाई शब्द वापरला आहे हे कळले. पण यश मिळवताना चिकाटी, आत्मिक बळ, यांचे पारडे जड ठरते, संघर्षाचे नाही. त्या अर्थाने लढाई शब्द आवडला नाही.