कुठच्या ना कुठच्या प्रकारे सीमोल्लंघन करण्यासाठी शुभेच्छा.
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण कंफर्ट झोन इज द होल थींग अ पर्सन इज सर्चिंग!
सर्व मानवी शोध हा गर्भात असलेल्या सुखाचायं, इकडे इच्छा की तिकडे पूर्ती, सगळं कसं निष्प्रयास, शांत, निवांत.
मोबाईलचा शोध पहा, इकडे अमक्या व्यक्तीशी बोलायची इच्छा की नुसत्या डायलींगनी ती व्यक्ती कुठेही असली तरी बोलायला उपलब्ध. वेब बघा, नुसती त्या व्यक्त्तीला भेटायची इच्छा की ती व्यक्ती समोर. कपडे नुसते धुवून हवे म्हटलं की वॉशिंग मशिनमध्ये टाकायचे आणि बटन ऑन केलं की काही मिनीटात कपडे धुवून, वाळवून तयार.
मग का होऊ शकत नाही माणूस सुखी? तुम्ही कधी विचार केलायं? तर ही सिमोल्लंघनाची उर्मी! जरा स्वास्थ्य गवसलं की आपण बेचैन होतो, छे! यात काय विषेश? चला तिकडे! ही काय बायकोयं? ती बघा! भारतात काय ठेवलंय? चला अमेरिकेला! आणि अमिरिकेत गेल्यावर मग लक्षात येतं, कसाका असेना आपला भारतच बरा होता!
>मर्ढेकरांच्या भाषेत, नदीवर चांदण्यात डुंबण्यापेक्षा घरातच पाऱ्याच्या पारव्या प्रकाशात तोतऱ्या नळाची धार डोक्यावर घेणं सोपं वाटतं.
हे असं कॉंप्लेक्सीव वाचून आपण निष्कारण हळवे होतो आणि मग उपलब्ध निर्मूल्य होतं.
साहस सिमोल्लघंनात नाहीये, आहे ते सजवण्यात, आहे ते रंगवण्यात, आहे त्याचा उत्सव करण्यात आहे.
आहे ती परिस्थिती खरंच दारूण असेल तर नक्की बदला पण इंटरनेटवर इतका वेळ घालवणारे संपन्न नसतील आणि त्यांची परिस्थिती दारूण असेल हे अशक्य आहे. आहे ते का भोगता येत नाहीये ते पहा, सिमोल्लघंनापेक्षा सर्व अस्वास्थ्याचं उल्लंघन करून 'या क्षणात' या ते कोणत्याही उल्लंघनापेक्षा जास्त श्रेयस आहे.
संजय