कोणत्याही साहित्यकृतीच्या भाषांतरास स्वतंत्र साहित्यकृती अशी मान्यता मिळत नाही

तरीही भाषांतर ही एक कला (कौशल्य म्हणा हवे तर) आणि भाषांतरित साहित्य ही (चांगली/वाईट) कलाकृती असतेच.

आस्वादकाला मूळ साहित्य जसेच्या तसे उपलब्ध नसेल, किंवा आस्वादासाठी त्या भाषेचे पुरेसे ज्ञान नसेल तर भाषांतरित/रूपांतरित कलाकृती आनंद देतेच. (मी कित्येक रहस्यकथा (शेरलॉक होम्स वगैरे) किंवा विद्यान काल्पनिका (ज्यूल व्हर्न लिखित (भाषांतर : भा रा भागवत)) किंवा हेर कथा (जेम्स बॉंडच्या गोष्ठी) केवळ भाषांतरातूनच वाचलेल्या आहेत.

संशयकल्लोळ हे नाटक भाषांतरित/रूपांतरित आहे, हे सुरवातीला माहीतही नव्हते. त्याने काही अडलेही नाही.

त्यामुळे अज्ञानी आस्वादकाच्या दृष्टीने मूळ साहित्य अस्तित्वात असले काय नसले काय फरक पडण्यासारखा नसतो. त्याच्या दृष्टीने भाषांतरित साहित्य हेच मूळ साहित्यकृतीसारखे असते, असे मला वाटते.