मी जेंव्हा जेंव्हा प्रामाणिकपणे सरुपाचा विचार करतो (प्रामाणिकपणे म्हणण्याचा अर्थ जेंव्हा जेंव्हा हा प्रश्न मला जाणवतो) तेंव्हा तेंव्हा मला व्यक्तीत्वाच्या एखाद्या पैलुचंच दमदार-ठळक असं दर्शन होतं, त्याक्षणी निराकार वगैरे गोष्टी अजीबात मनात येत नाहि. बरं, सतःला सारखं बजावत जावं कि आपण निराकार आहोत, तर आत कुठेतरी खोटं बोलण्याची जाणीव होते. मग अश्या दुभंगलेल्या अअस्थेत राहण्यापेक्षा मी व्यक्तीत्वाचा सीकार  करतो आणि आहे त्या परिस्थितीला तोंड देतो. हे चक्र कसं भेदायचं काही कळत नाहि...