तुम्ही सुरूवात विरोधाभासानी केली पण  नंतर 'कोण बरोबर? की दोघेही?' असा सवाल टाकून लेखनाचा हेतू गंमत की कोडे? असा केला, पुन्हा शिर्षकही 'कोण बरोबर?' असं देऊन पब्लिकला गोंधळात टाकलंत!

त्यावर विरोधाभासाची गंमत न राहता नैतिक प्रतिसाद यायला लागले.

तुम्ही देखील 'खटला चालवणे योग्य? असा प्रतिसाद दिला  आणि  त्यात 'तोंडी करार' वगैरे प्रश्न निर्माण केला म्हणजे तुम्हाला तरी नक्की विरोधाभास कळला होता का असं वाटण्याची शक्यता आहे! कारण करार तोंडी की लेखी हा प्रश्नच नाहीये!

शिवाय दोघेही बरोबर असतील तर मग विरोधाभासाची गंमत कुठायं?

मला वाटतं मांडणीत किंवा आकलनात चूक होणं स्वाभाविक आहे, ती दिलखुलासपणे मान्य करण्यात मजा आहे, सारवासारव करणं आपल्याला जास्त अडचणीत आणतं!

संजय