या काल्पनिक कथेत विरोधाभास असायं की शिष्याला दावा हरला काय आणि जिंकला काय त्याला शिक्षणाची फी द्यावी लागणार नाही.
साधारणपणे हारल्यावर दाव्याची रक्कम द्यावी लागते पण इथे ती द्यावी लागणार नाही हा खरा विरोधाभास आहे.
आता अशा परिस्थितीत शिष्य दुसऱ्या वकीलाकडून कशाला केस लढवेल? आणि हा मुद्दा देखील इथे गैरलागू आहे.
असो, मला फक्त वैचारिक सुस्पष्टता कशी असायला हवी इतकंच दाखवायचं होतं. मला एखादी गोष्ट कुणी सांगीतली आणि मला नवीन अँगल मिळाला तर मी पहिल्यांदा काय करत असीन तर समोरच्याला दाद देतो कारण मला वाटतं अहंकार नसणं म्हणजे सोप्याचा स्विकार करणं मग ते सोपं कुणी का करेना! जर गोड गात असेल आणि उत्तम हार्मोनियम वाजवत असेल तर रस्त्यावरच्या गायकाला शंभर रूपये देऊन त्याचं गाणं ऐकत मी भर रस्त्यावर उभा रहातो. अर्थात हा माझा जगण्याचा दृष्टीकोन आहे, तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्हाला ऊगीच त्रास द्यावा असा माझा कदापिही हेतू नाही.
संजय