कै. सोनपाटकी हे लोकसत्ता आणि म. टा. मध्ये सातत्याने लिहीत. तमसातटाकी हे पुस्तक अशाच लेखांचा संग्रह आहे असे वाटते.(चू.भू.दे.घे.) बरीच वर्षे लंडन मध्ये काढल्यावर इथे महाराष्ट्रात युतीची सत्ता आली असताना मोठ्या अपेक्षेने ते तळेगाव येथील आपल्या बंगल्यात निवांतपणे राहायला आले. पण दरोडेखोरांच्या टोळीने केलेल्या हल्ल्यात प्रतिकार करताना त्यांना प्राण गमवावे लागले. या आकस्मिक घाल्याने व्यथित आणि निराश होऊन त्यांच्या पत्नीने इथले अल्पकालिक वास्तव्य आवरून लंडनला परतण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे त्या इंग्लंडला परतल्या.
हे दांपत्य लंडन च्या महाराष्ट्रमंडळात सक्रिय होते. त्यामुळे तिथे काम करणाऱ्या मानवतकर, नवाथे,मोने आदी कुटुंबीयांकडून माहिती मिळू शकेल.
'भारताबाहेरची सशस्त्र स्वातंत्र्यचळवळ' या विषयी वीणा गवाणकर यांच्या 'नाही चिरा नाही पणती- डॉ. सदाशिव खानखोजे' या पुस्तकात बरीच माहिती आहे.