हे दोन्ही निकष एकाचवेळी एकाच कलाकृतीला लागू पडणार नाहीत. संशयकल्लोळ, ती फुलराणी ही उत्तम रूपांतरे आहेत पण त्यांना स्वतंत्र कलाकृती म्हणता येणार नाही.
चित्रपट, नाटके या माध्यमांतून अशी रूपांतरे पुष्कळच आढळतात. 'रोमन हॉलिडे' या चित्रपटाची हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक रूपांतरे झाली.ती सरस उतरली आणि धंद्याच्या दृष्टीने यशस्वीही ठरली. पण मूळ कथाबीज आणि चौकट परकीय असल्याने त्यांना 'स्वतंत्र' या रकान्यात घालता येणार नाही.