सव्य-अपसव्य ह्या विरुद्धार्थी जोडशब्दासंबंधी अत्यंत उपयुक्त माहिती मिळाली. मृदुला,भोमेकाका,सुभाष ,धन्यवाद.
गीर्वाणलघुकोशात दिलेले अर्थ--सव्य-१)डावे २)दक्षिणेकडचे ३)प्रतिकूल ४) उलट आणि अपसव्य---१)उजवे २) उलटा ३) विपरीत ४) जानवे उजव्या खांद्यावर घेणे (श्राद्ध इ. मधे )
      हे दोन शब्द १. उलट  २. विपरीत ह्या अर्थाने समानार्थी  वाटतात. तसे वापरतात का? कदाचित हे शब्द त्या त्या क्रियेशी संबंधित असल्याने असे अर्थ असावेत. विशेष माहिती असल्यास द्यावी.
     जानवे---- ह्या शब्दाविषयी माहिती सदर विषयाशी संबंधित नसली तरी अपसव्यचा तो एक अर्थ असल्याने द्यावीशी वाटत आहे.
     संस्कृत शब्द यज्ञोपवीत याची प्राकृत भाषेत रुपांतर होते " जण्णोवईअ" अथवा "जण्णोवीअ", या जण्णोवीअचेच पुढे झाले जानवे , आणि हिंदीमधे जनेऊ.
     जंबिया खड्गाच्या द्वंद्वयुद्धात " जानवा" या नावाने एक प्रहार ओळखला जातो. डाव्या खांद्यावरून उजव्या बाजूला खालीजाणारा वार केल्यास तो "जानव्याचा वार " असे म्हटले जाते. जानवे घालण्याच्या पद्धतीवरूनच या प्रहाराला असे नाव पडले असणार. याच्या उलट म्हणजे खालून वर जाणाऱ्या वारास " उलटा जानवा " असे म्हटले जाते.
(शब्दनिष्ठ)