पाककृती सोपी वाटली पण पालकाचे वाटण कणकेत कालवल्याने सगळ्या मिश्रणाचा रंग फिकट हिरवा होतो. त्यामुळे आणि एरवीही शेकवल्यानंतर मूळचे रंग फिकट होतात म्हणूनही तयार पराठ्यावर नक्षी फारशी उठून दिसत नाही. वाफवलेला पालक निथळवून चिरून कणकेत मिसळला तर नक्षी अधिक चांगली उमटते. वाफवून किसलेल्या बीटचे अगदी थोडे तुकडे पराठा लाटता लाटता त्यावर पेरले तर बीटचा रंग जिथल्या तिथे राहातो पण लाटताना तांदळाची पिठी किंवा जे काही पीठ घेतले असेल ते जास्त लागते.
सादरीकरण आवडले.