तुम्ही गझलचं ‘वजन’ समजाऊन घ्या, तुम्हाला आणखी मजा येईल. वजन ही तालाच्या अंगानी जाणारी कल्पना आहे, तुम्ही आहिस्ता-आहिस्ता मध्ये जो डॅश दिलायं तो वजन दर्शवतो.
या ओळी अशा आहेत:
वो बेदर्दीसे सरका देना मुझे और मैं कहूं उनसे
हुजूर आहिस्ता-आहिस्ता, जनाब आहिस्ता-आहिस्ता
याच गझलमध्ये आणखी एक सुंदर शेर आहे:
शबे फुर्कतका जागा हूं फरिश्तों अब तो सोने दो
कभी फुरसतमे कर लेना हिसाब, आहिस्ता-आहिस्ता
म्हणजे, विरहाच्या रात्रीपासून मी जागा आहे, देवदूतांनो, आता मला जरा झोपू द्या
माझ्या आयुष्याचा हिशेब (जो तुम्ही आता करायला आला आहात तो) आपण जरा फुरसतीनं करूया, (आणि तो ही कसा तर) आहिस्ता-आहिस्ता!
जगजीतची आणखी एक सुरेख गझल आहे ती ऐकली नसेल तर जरूर ऐका:
दुनिया जिसे कहेते है जादूका खिलौना है
मिल जाए तो मिट्टी है, खो जाए तो सोना
त्या गझलमध्ये एक शेर आहे:
बरसातका बादल तो दिवाना है क्या जाने
किस छतपे बरसना है, किस राहसे बचना है
आणि शेवटचा शेर असायं :
अच्छासा कोई मौसम, तनहासा कोई आलम,
हर वक्तका रोना तो बेकार का रोना है
दुनिया जिसे कहेते है जादूका खिलौना है!
संजय