प्रत्येकजण हा आपली आवड निवडण्यास स्वतंत्र आहे. त्यासाठी त्याचा अपमान करण्याचे काहीच कारण नाही. आता, तुम्ही उल्लेख केलेला ' ट्रान्स' हा संगीत प्रकार मला व्यक्तिशः अजिबात आवडत नाही, किंबहुना मला त्याची ऍलर्जीच आहे असे म्हणा. पण तुम्हाला काय आवडावे ते मी तुमच्यावर लादणार नाही. फक्त आपण दोघे मिळून संगीताचा आनंद घेऊ शकणार नाही एवढेच.