जगजीतसिंगांची फारशी गाणी मी ऐकलेली नाहीत, त्यामुळे त्यांच्या गायकीबद्दल मला काहीच माहिती नाही. 'साथ साथ' ह्या चित्रपटातले 'जिंदगी धूप तुम घना साया' हे गाणे मात्र मला तसे बऱ्यापैकी आवडले होते.
मात्र आज रसभंग झाल्यासारखा वाटला.
बीबीसीवर कुठल्याशा कार्यक्रमात 'तेरा चेहरा ऐने जैसा... ' असे काहीसे गाणे लावले होते. जागोजागी ते इतके बेसूर वाटत होते की हा गायकीतला दोष आहे की (वेग कमी जास्त झाल्याने ) ध्वनिमुद्रणाचा(स्टुडिओचा) की ध्वनिनिर्मितीतला (बीबीसीवाल्यांचा) दोष होता कळेना.
कुणाला माहीत असल्यास माहिती द्यावी.