'आपकी नजरोंने समझा प्यार के काबिल मुझे' या गीतात 'कोई तूफ़ानोंसे कह दे,
मिल गया साहिल मुझे' अशी एक ओळ आहे. त्यावरून साहिल म्हणजे किनाराच असावा.
उलट, नेमक्या याच ओळीमुळे 'साहिल' म्हणजे 'नावाडी', अशी माझी (गैर)समजूत झाली होती. (म्हणजे, 'कोणीतरी वादळांना सांगा, की तुमच्यातूनसुद्धा समर्थपणे वाट काढून, तारून नेऊन सुखरूपपणे किनाऱ्यावर नेऊन सोडणारा कुशल नावाडी मला मिळाला आहे', असा अर्थ मी घेतला होता. 'वादळांनो, (नावाडी नसतानासुद्धा, यदृच्छया) मला किनारा अगोदरच सापडलेला आहे, आणि मी किनाऱ्यावर (भरकटत का होईना, पण) अगोदरच पोहोचलेली आहे! टुकटुक! तुमचा पचका! ' असे (किनाऱ्यावर पोहोचून नाव खांबाला बांधून झाल्यानंतर मग निवांतपणे) वादळांना वेडावून दाखवण्याचा यात उद्देश असेल, अशी कल्पना नव्हती. असो. आमचा कर्तृत्ववाद असा नको तेथे नको ते अर्थ घेतो - चालायचेच!)
पण मग 'माझी-बग़ैर नैया साहिल को ढूँढती है'चा काहीच अर्थ लागत नाही. 'नावाड्याविना नाव नावाड्याला शोधते'? हे तर अतिशय ट्रिवियल (मराठी?) वाटते. (म्हणजे, शेवटच्या नावाड्याने राजीनामा देऊन पदत्याग - तसेच (कदाचित पाण्यात उडी मारून) नौकात्याग - केल्याकारणाने, ते (शब्दशः) रिक्त झालेले पद भरण्यासाठी नावेने (वर्तमानपत्रांतून वगैरे जाहिरात देऊन) नवीन उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत काय?)
त्यापेक्षा 'नावाड्याविना नाव किनाऱ्याला शोधते' हे अधिक सयुक्तिक वाटते. त्यामुळे 'साहिल' म्हणजे 'किनारा'च असावा, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)