मीही 'मिल गया साहिल मुझे' चा अगदी असाच अर्थ इतके दिवस लावला होता. आता या धाग्याच्या निमित्ताने 'साहिल' शब्दाचा समावेश असलेली गाणी शोधू जाता नेमके 'माझी बग़ैर नैया साहिल को' हेच आठवले आणि माझा तर्क मी बदलला.पण पुन्हा उलट पाहू जाता 'नावाडी नसलेल्या नावेला नावाड्याची आस आहे' असाही अर्थ योग्य वाटू लागला आहे. या ओळीत बहुधा दोनदा 'माँझी'(माझी?) किंवा दोनदा 'साहिल' खुलून दिसले नसते. कुणाला तरी एकाला डच्चू देणे किंवा कुणा एकाचा तरी राजीनामा मागणे) भाग होते. तरच तलाश जारी राहिला असता ना?(किंवा एकाचा दोनदा उपयोग करण्याऐवजी दोन्हीचा एकेकदा प्रयोग करणे सर्वसमावेशक वाटले असावे.)
असो. सध्या तरी उर्दू शब्दकोश हाताशी नाही. आणि एकदोन दिवसांत जकार्तावाले सुधीर खुलासा करणारच आहेत, तेव्हा थोडे थांबावे हे बरे.