'गद्य साहित्य' या सदरातल्या 'अल विदा जगजितसिंह' या धाग्यावर प्रतिसाद लिहिताना 'आहिस्ता चल' ही जोडी आठवली. पैकी ग़ुलाम अली यांनी गायलेल्या गाण्याचे शब्द आहेत, 'संग रहने की खायी थी कसम, जरा आहिस्ता चल' आणि पंकज उधास यांच्या गाण्याचे शब्द आहेत, 'दर्द की बारिश सही मद्धम, ज़रा आहिस्ता चल'.
दोहोंची चाल साधारण सारखीच आहे. पंकज उधासांच्या गाण्याच्या पद्धतीत गांभीर्य अधिक आहे. (म्हणून की काय,) ते अधिक आवडते.