तुमचे बहुतेक मुद्दे पटले. विशेषतः माणूस कंफर्ट झोन शोधण्याचा प्रयत्न करत असतो हा. पण कंफर्ट म्हणजे नक्की काय यावर ते अवलंबून आहे. दुःखांपासून मुक्ती या अर्थाने सर्वच कंफर्ट शोधत असतात. मी ज्या कंफर्ट झोनविषयी बोलतो आहे तो थोडा वेगळा आहे. कष्टांपासून मुक्ती या अर्थाने मी तो शब्दप्रयोग वापरला आहे. काही कष्ट करण्याच्या प्रक्रियेत आनंद असतो. त्यातून मिळालेलं फळ गोड लागतं. आपल्या बागेत आपण पिकवलेली वांगी, टोमॅटो यांची चव न्यारी असते. कष्ट कमी कमी करण्याच्या भानगडीत आपण कष्टांपासून स्वतःला इतकं दूर केलं आहे का, की ती गोडी, ती चव विसरलो आहोत? एवढाच प्रश्न आहे. ज्यांची परिस्थिती दारुण आहे अशांसाठी हा लेख नाहीच. जे सुस्थितीत आहेत, त्यांच्यासाठीच हा प्रश्न उभा राहतो.
आपण आहोत तिथे पोचायचं म्हणून अट्टाहास केला होता की वाटेत कुठेतरी सुखाच्या ओऍसिसपाशी रेंगाळून 'मरो तो प्रवास, मरो ती मंझिल' म्हणतो आहोत? या प्रश्नाचं उत्तर स्वतःपुरतं शोधण्यासठीच सीमोल्लंघनाच्या शुभेच्छा आहेत.