आपला प्रतिसाद रसपूर्ण व अर्थगर्भ होता. विसंगती उलगडून दाखवण्याचा गर्भितार्थ समजला.

आता अवांतरातले अवांतर : खुद्द श्री. महेश यांनी(च) अर्थस्फोट केल्याने 'साहिल'च्या अर्थाची आणखी शकले किंवा चिंधड्या उडण्याची शक्यता मावळली असली तरी;

तमाम हिंदी चित्रपटगीतांतून 'साहिल' हा शब्द अशा संदिग्ध संदर्भांत व रीतीने वापरला गेला आहे की उर्दू/हिंदी शब्दकोश हाताशी नसला तर 'साहिल'चा अर्थ 'नावाडी' असा वाटणे/पटणे साहजिक आणि शक्य आहे.