तुम्ही म्हणता ते कष्ट शारीरिक आहेत आणि ते करणं स्वास्थ्यदायी आहे. खेळ, निवांत भटकणं, बागकाम, योगासनं वगैरे त्याला सर्वोत्तम पर्याय आहेत.
पण ते सिमोल्लंघन नाही.
तुम्हाला सिमोल्लंघनाचं उत्तम उदाहरण पहायचं असेल तर 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' बघा. सुखाच्या शोधात आहे ते सोडून काही तरी थ्रिलींग करा ( आणि थ्रिल म्हणजे काय तर जीव धोक्यात घाला) असा मूर्ख संदेश तो चित्रपट देतो.
माणसाची फार मोठी गल्लत अशीये की तो एक्साईटमेंट म्हणजे आनंद समजतो त्यामुळे त्याला सतत नवी एक्साईटमेंट शोधावी लागते आणि तसं काही नसेल तर बोअर होतं! आनंद म्हणजे स्वास्थ्य, मी म्हणतो तो कंफर्ट झोन त्यात राहून तुम्ही काहीही करा ते सुखदायी होईल.
माझं सांगणय 'आहे ते नीट उपभोगा' आणि 'जे गैरसोयीच वाटतंय ते सहन करत जगण्यापेक्षा बदला' ते विधायक आहे.
संजय